पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पामुळे उपनगरी रेल्वेला नवी गती मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे 98 टक्के काम झाले आहे. यामध्ये नऊ मोठे पूल, ३५ लहान पूल, १६ अंडरब्रिज, पाच उड्डाणपूल, तीन बोगदे यांचा समावेश आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कला नवी जीवनवाहिनी ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) सुमारे २,७८२ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे तब्बल ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच या मार्गावर रेल्वे वाहतुकीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-३ अंतर्गत उभारण्यात येत असलेला हा २९.६ किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वेमार्ग नवी मुंबई, रायगड आणि कर्जत परिसरातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करणार आहे. सध्या कल्याण जंक्शनमार्गे होणाऱ्या प्रवासामुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा कॉरिडॉर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्व जमीन संपादन पूर्ण झाले आहे. वन विभागासह विविध शासकीय यंत्रणांकडून आवश्यक मंजुरीही प्राप्त झाल्या आहेत. प्रकल्पांतर्गत नऊ मोठे पूल, ३५ लहान पूल, १६ अंडरब्रिज, पाच उड्डाणपूल, तीन बोगदे तसेच कर्जत रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून मोहापे आणि किरावली येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
रेल्वे मार्ग जोडणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून सिग्नलिंग आणि दूरसंचार यंत्रणेची उभारणीही वेगाने सुरू आहे. मोहापे आणि चौक स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीसाठीच्या ‘फॅक्टरी अॅक्सेप्टन्स टेस्ट’ यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
प्रवाशांना कल्याणमार्गे वळसा घालण्याची गरज राहणार नाही
हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पनवेल आणि कर्जतदरम्यान स्वतंत्र उपनगरी रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कल्याणमार्गे वळसा घालण्याची आवश्यकता राहणार नाही. प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच रेल्वेची वहनक्षमता वाढणार असून उपनगरी रेल्वे नेटवर्क अधिक कार्यक्षम आणि सक्षम होणार आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असते. या रेल्वे स्थानकावरुन उत्तर भारत आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या जातात. या रेल्वे स्थानकाच्या पुढे दोन वेगवेगळे मार्ग जातात. एक मार्ग कसाऱ्याच्या दिशेला जातो तर दुसरा कर्जत, खोपोलीच्या दिशेला जातो. यामुळे रेल्वे स्थानकावर मोठा ताण बघायला मिळतो. पण कर्जत-पनवेल कॉरिडोर सुरु झाल्यास कल्याण रेल्वे स्थानकावरचादेखील काही भार हलका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नवी मुंबई, कर्जत आणि परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या निवासी आणि औद्योगिक विकासालाही या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना जोडणारा हा कॉरिडॉर प्रादेशिक संपर्क मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा