Ajit Pawar in Wardha : उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर असताना एका कार्यकर्त्याने प्लास्टिक पिशवी रस्त्यात टाकल्यावर त्याला चांगलंच झापलं. काय रे तुम्ही? लोक शिव्या देतात, असं म्हणत त्यांनी रस्त्यात कचरा टाकण्यावर नाराजी व्यक्त केली.
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वर्ध्यात अजितदादा पोहोचल्यानंतर ते त्यांच्या कारमधून उतरतात. त्यावेळी दादांच्या स्वागतासाठी कारसमोर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हातात हार, पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. दादा कारमधून उतरल्यानंतर जमलेले कार्यकर्ते त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना अरे, पाया पडू नका. मला पाया पडलेलं आवडत नाही, असं म्हटलं.
Raj Thackeray meets Devendra Fadnavis : बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा धुव्वा, दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे ‘वर्षा’वर, फडणवीसांसोबत गुफ्तगू
त्याचवेळी तिथे वर्ध्यात अनेक कार्यकर्त्यांप्रमाणे एका कार्यकर्त्याने दादांसाठी हार आणला होता. एका पदाधिकाऱ्याने त्या कार्यकर्त्याकडे दादांना घालण्यासाठी हार मागितला. त्यावेळी कार्यकर्त्याने प्लास्टिकच्या पिशवीतून हार बाहेर काढला आणि ती प्लास्टिकची पिशवी खालीच रस्त्यात टाकून दिली. कार्यकर्त्याची हीच कृती अजित पवारांनी पाहिली आणि एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या प्लास्टिक पिशवी खाली टाकणाऱ्या कार्यकर्त्याला झापलं. कचरा करायचा? काय रे तुम्ही, वेड्याचा बाजार, घे ती प्लास्टिकची पिशवी इथे… असं बोलून स्वत: अजित दादा ती पडलेली पिशवी उचलण्याखाली खाली वाकतात. पण तेवढ्यात आणखी एक जण खाली वाकून ती पडलेली पिशवी उचलतो.
Raj Thackeray : बेस्ट पतपेढी ही स्थानिक निवडणूक, राज ठाकरेंनी विषय टाळला, ‘मला माहितच नाही.. छोटी गोष्ट आहे’
त्यानंतर अजित दादा पुढे चालत जातात. ते चालत जात असतानाच, तुम्हाला लाजा वाटत नाही का रे, वेडे आहेत, घाण करता, शंभर वेळा सांगतो पिशव्या-बिशव्या अशा टाकू नका, लोकं शिव्या देतात, असं म्हणत कार्यकर्त्याने रस्त्यात कचरा टाकल्याबाबत आपली नाराजी व्यक्त करतात.
मोनोरेल बिघाडावर अजित पवारांची प्रतिक्रिया, रेस्क्यू ऑपरेशनबद्दल सविस्तर सांगितलं
दरम्यान, अजित पवार वर्धा जिल्ह्यात आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या दौऱ्यावेळी अजित दादांची ही कृती पुन्हा एकदा त्यांच्या रोखठोकपणाचा आणि शिस्तप्रियतेचा दाखलाच देऊन गेली.

