आमदार चिखलीकरांनी केली मुखेड तालुक्यातील पूरग्रस्थ भागाची पाहणी, शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन
मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली, शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले, शेकडो कुटुंब उघड्यावर, अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून न जाता धीर धरावा, सरकार आपल्या पाठीशी आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांना मदत मिळेल असा विश्वासराष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला. चिखलीकर यांनी मुखेड तालुक्यातील पूरग्रस्थ भागाची पाहणी केली. ढगफुटी सदृश्य पाऊस आणि लेंडी धरणाला आलेल्या पुरामुळे हसनाल, रावनगाव भेंडेगाव या गावांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हासनाळ येथील पाच जणांचे पुरात बळी गेले . शेकडो गाई म्हशी वाहून गेल्या तर हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत हवालदिल झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना चिखलीकरांनी धीर दिला. शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार चिखलीकर यांनी यावेळी दिले .
