Pawar Family Marathi News : राज्यासह देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहणाऱ्या पवारा कुटुंबावर ओबीसी नेत्याने जहरी टीका केली आहे. पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तर अजित पवार हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टराचे नेते आहेत. खासदार सुप्रिया सुळेंना संसदरत्न पुरस्कार का मिळतो असा सवाल करत निशाणा साधला आहे. नेमकं कोणी केली टीका, जाणून घ्या.
महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू पाहत आहेत. त्यामुळे पुढील काळात असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं असा इशारा हाके यांनी दिला आहे.
वसंतदादा पाटलांचं सरकार का पाडलं? शरद पवार यांनी उघडपणे सारं काही सांगितलं
पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. असं त्यांनी म्हटलं आहे तर अजित पवार हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार,कारखानदार यांचे नेते असल्याचे म्हणत ते जातीयवाद करत असल्याचा देखील आरोप हाके यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे या केवळ वडिलांच्या मायलेज वर निवडून येतात. त्यांचं संसदेत काय काम आहे? म्हणून त्यांना आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळतो? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजातल्या तळागाळातील लोकांचे प्रश्न कधी संसदेत मांडले आहेत का? त्याच्यावर कधी आवाज उठवला आहे का? असा प्रश्न देखील हाके यांनी उपस्थित केला आहे.

