Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये संदिपान भुमरेंच्या कार्यालयासमोर एका इनोव्हा गाडीने वृद्ध महिलेला धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.
महिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय क्रीडा संकुल जवळ खासदार संदिपान भुमरे यांचं कार्यालय आहे. या कार्यालयासमोर एक अपघात झाला. अपघातात इनोवा गाडीने एका वृद्ध महिलेला धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे.
Jalgaon Crime : दारु ढोसून का आला? जाब विचारल्याचा मुलाला राग, पोटच्या पोरानं जन्मदात्या बापाला निर्घृणपणे संपवलं
मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने अपघात, जीवितहानी नाही; पण प्रवासी गाड्या अडकल्या!
इनोव्हा गाडीत बसलेला व्यक्ती खाली उतरला त्याने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला उचलून रस्त्याच्या बाजूला ठेवलं. महिलेला बाजूला ठेवल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या इनोव्हा गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्याचं देखील दिसत आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली असून सध्या समाज माध्यमांवर ही घटना चर्चेत आहे.

