Beed News: बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी बँकेवर मुंडे बंधू-भगिनींनी पुन्हा वर्चस्व राखलं असून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.
वैद्यनाथ सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळाली. निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी ४ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत १६ हजार २२८ मतदारांनी मतदान केले. हे एकूण मतदारांच्या ३८.५ टक्के आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी कमी मतदान झाले.
Nagpur Rain : नागपुरात तासभराच्या पावसाने रस्ते जलमय, वाहतूक ठप्प; चेंबर्स ठरतायत डोकेदुखी, महापालिकेचा सुस्त कारभार?
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या पॅनलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेभाऊ फड यांनी आव्हान उभे केले होते. निवडणुकीत मुंडे बहीण-भाऊ एकत्र आलेले दिसले. बँकेच्या एकूण १७ जागांपैकी ४ जागा बिनविरोध जिंकल्या गेल्या. त्यामुळे उर्वरित १३ जागांसाठी मतदान झाले. बँकेचे ४३ हजार ९६२ सदस्य मतदार होते. बीड जिल्ह्यात ६७ मतदान केंद्र होती. तसेच लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, जळगाव, नाशिक, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मतदान केंद्र होते.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर, १२ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महिला मतदारसंघातून डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, माधुरी योगेश मेनकुदळे, ओबीसी मतदार संघातून अनिल तांदळे, तर अनुसूचित जाती मतदार संघातून विनोद जगतकर बिनविरोध संचालक म्हणून निवडले गेले.
दरम्यान, विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. “लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने विजयी आघाडी घेतली आहे,” असे निकालानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या.

