• Sun. Jun 21st, 2026

    राजधानीत महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 17, 2026
    राजधानीत महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    नवी दिल्ली, १७ : मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज राजधानीत अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार, व्यवस्थापक प्रमोद कोलपत्ते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

    याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलपत्ते यांनी मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.

    00000000

     

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed