• Sun. Sep 20th, 2026

ओमराजेंवर दबाव, संजय जाधवांवर नाराजी; खासदारांच्या फुटीनंतर अयोध्या पौळ आक्रमक

ओमराजेंवर दबाव, संजय जाधवांवर नाराजी; खासदारांच्या फुटीनंतर अयोध्या पौळ आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठा भूकंप आला आहे. ठाकरेंचे सहा खासदार पक्षाची साथ सोडणार असल्याने मोठी खळबळ उडाली. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील प्रचंड संतापल्या. ठाकरेंनी सर्व काही देऊनही खासदारांनी गद्दारी केल्याची टीका अयोध्या पौळ पाटलांनी केली. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांवर दबाव असल्याचा दावाही त्यांनी केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed