Nagpur Gangster Sameer Sheikh Murder : नागपुरमध्ये पुन्हा एक हत्येची बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड समीर शेख याची काही जणांनी त्याला रस्त्यात गाठत त्याला निर्घृणपणे संपवलं आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा गुरुवारी पहाटे मोमिनपुरा येथील आपल्या सासुरवाडीतून घरी परतत असताना त्याच्यावर घातपात झाला. अशु नामक गुन्हेगार आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी पूर्वनियोजित कट रचून कोयते आणि बेसबॉलच्या दांड्यांचा वापर करत त्याच्यावर हल्ला केला. हे हल्लेखोर त्याच परिसरात राहत असून, हत्या घडवून आणल्यानंतर ते फरार झाले आहेत. विशेष म्हणजे ही घटना अशुच्या घराजवळच घडल्याने संशय आणखी बळावतो आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
हल्ल्यानंतर समीर शेख गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केला.
UP News: रात्री अंड खायला बाहेर पडलेल्या भाजप नेत्यावर गोळीबार, परिसरात खळबळ, आदल्या दिवशी त्याच ठिकाणी…
या हत्येमागे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाची लढाई असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. समीर शेख व अशु यांच्यात मागील काही काळापासून वाद सुरु होता. त्याचेच रूपांतर अखेर हिंसक हत्येत झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत. आरोपी अशु आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

