पुण्यात झेड ब्रिजजवळ गँगवॉरसदृश प्रकार; कोयत्याने प्राणघातक मारहाण, तरुण गंभीर जखमी
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात पुन्हा एकदा गँगवॉरसदृश प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून काही युवकांनी झेड ब्रिज परिसरात एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.
