महादेव मुंडेंचा एसआयटी तपास अखेर 21 महिन्यानंतर सुरू झालाा आहे. त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक आंदोलने केली होती. आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक झाल्याने तपासास गती मिळाली आहे.
.
शेवटी या प्रकरणात निःपक्ष आणि पारदर्शक तपासणी होण्यासाठी मयत महादेव मुंडे यांच्या कुटुंबाने प्रकरण एस आय टी कडे देण्यात यावें असे म्हटले होते आणि तब्बल 2महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांची मागणी मान्य केली आणि एस आय टी मध्ये टीम लीडर म्हणून आय पी एस पंकज कुमावत याची नियुक्ती करण्यात आली. मयत महादेव मुंडें यांच्या हत्येस 21 महिने होऊन गेले अद्याप या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले नाही.मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून पंकज कुमावत यांना घेण्यात यावे म्हणून केली होती मागणी.
निमित्ताने मयत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात दोषी म्हणून कोणाचे नाव समोर येणार आणि कश्या पद्धतीने महादेव मुंडे यांच्या खुनाचा डाव रचला होता याचा तपास करण्यासाठी आज परळी येथील तहसील कार्यालय परिसरात या ठिकाणी पंकज कुमावत व त्यांच्या टीमने पाहणी केली. यावेळी पंकज कुमावत त्यांनी माध्यमांशी मात्र बोलण्याचे टाळले.

