Akola News : नागपंचमीच्याच दिवशी सर्पदंशाने घडले अनर्थ, मुंडगाव येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
नागपंचमीच्या दिवशी सकाळी शेतात गेलेल्या महिलेला सर्पदंश झाला. बेबीनंदा मधुकर वानखडे, वय ५५ वर्ष, यांना रस्त्याने जाताना मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला होता. त्याना मुंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, पण इथे महिलेवर उपचार झाले नसल्याने अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र महिलेचा मृत्यू झाला.
