Pune Couple Video Viral: पुण्यात एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे जोडपं चालत्या दुचाकीवर अश्लील चाळे करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील आहे. खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर हे जोडपे दुचाकीवर रोमान्स करत होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पुरुष दुचाकी चालवत आहे आणि महिला दुचाकीच्या टाकीवर पुरुषाकडे तोंड करून बसलेली आहे. रस्त्यावरून जात असताना या जोडप्याचे अश्लील चाळे सुरू होते.
पुण्यात जोडप्याचा दुचाकीवर खुल्लम खुल्ला रोमान्स, VIDEO व्हायरल pic.twitter.com/ZonxoWjMzL
— Maharashtra Times (@mataonline) July 28, 2025
महिला आधी टाकीवर झोपते आणि नंतर पुरुषाला मिठी मारते. विशेष म्हणजे महिलेने तोंडावर मास्क लावला आहे. पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकीस्वाराने हे दृश्य पाहिलं आणि त्यांनी हा व्हिडिओ शूट केला. बरेच अंतर पुढे जाईपर्यंत या जोडप्याचे हे चाळे सुरू होते.
Hyderabad News: बॅडमिंटन खेळता-खेळता कोसळला अन् 25 वर्षांच्या तरुणाचा अचानक मृत्यू, धडकी भरवणारा VIDEO समोर
गर्दीच्या रस्त्यावर रोमान्सच्या नावाखाली हे जोडपं जीव धोक्यात घालून अशाप्रकारे अश्लील चाळे करत होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. हे अति प्रेम आहे की, प्रेमाच्या नावावर अश्लिलता, असा प्रश्नही काहीजणांनी विचारला आहे.या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. भर रस्त्यात, वाहनांची वर्दळ असताना, अशा प्रकारे जीव धोक्यात घालून कृत्य करणे योग्य आहे का, असा सवाल विचारला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेवर अनेक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या जोडप्याच्या बेजबाबदार वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.

