Pune Rave Party : पुण्याच्या खराडी भागातील एका लॉजवर पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी तिथे रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीचे आयोजन प्रांजल खेवलकर यांनी केल्याचे बोलले जात आहे. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.
हायलाइट्स:
- पुण्यातील खराडी भागातील एका लॉजवर पोलिसांनी धाड
- एका फ्लॅटवर रेव्ह पार्टी सुरु होती
- प्रांजल खेवलकर यांनी पार्टीचे आयोजन केल्याची माहिती
- प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचे जावई
कोण आहेत प्रांजल खेवलकर ?
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचे पती आहेत. खेवलकरांनी ही पार्टी आयोजित केली होती, असे बोलले जात आहे. रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. दरम्यान, याप्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने राजकिय वातावरण चांगलेच तापणार आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Sanjay Raut : ‘गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय, आवरलं नाही तर फडणवीसांनाही….’ संजय राऊतांची गंभीर टीका
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे प्रांजल खेवलकर हे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत. पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे, पुण्यात या रेव्ह पार्टीमध्ये सापडल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

