Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हिणी घाटामध्ये सापडलेल्या तरूणाच्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. आरोपी दुसरा-तिसरा कोणी नाहीतर सख्खा भाऊ निघाला. पण त्याने का मारलं? जाणून घ्या.
अनिकेत अनिल शिर्के (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. हृषीकेश अनिल शिर्के (वय २३, दोघे रा. गायकवाड चाळ, मावळे आळी, कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाच्या परिसरात घडली. अनिकेतने सख्ख्या भावाला ताम्हिणी घाटात मारून टाकले आहे, अशी माहिती कर्वेनगर चौकीचे उपनिरीक्षक सचिन तरडे यांना मिळाली. त्याची खातरजमा करून वारजे पोलिसांच्या पथकाने अनिकेतचा शोध घेण्यास सुरुवात केली.
Ajit Pawar : आता सुट्टी नाही! अतिक्रमणांबाबत अजित दादांचे आढावा बैठकीत स्पष्ट आदेश, म्हणाले…
अनिकेत वनदेवी मंदिराच्या मागील टेकडीच्या परिसरात लपून बसला होता. तेथून पोलिसांनी अनिकेतला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने सख्ख्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलिसांनी ही कारवाई केली.
Ajit Pawar: कामाच्या आड मी आलो तरी गुन्हा दाखल करा; हिंजवडीत अजित पवार अॅक्शन मोडवर
अनिकेत आणि हृषीकेश शुक्रवारी रात्री कर्वेनगर येथून दुचाकीवरून रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील गोळवशी-शिर्केवाडी येथे देवदर्शनासाठी निघाले. दोघे मध्यरात्री ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाजवळ थांबले. हृषीकेशला मद्य व गांजाचे व्यसन होते. हे व्यसन सोडण्यावरून दोघांमध्ये भांडणे झाली. पहाटे तीनपर्यंत दोघांमध्ये भांडणे सुरू होती. रागाच्या भरात अनिकेतने हृषीकेशनवर लोखंडी हत्याराने वार केले. हृषीकेशचा मृत्यू झाल्यावर अनिकेत घटनास्थळावरून पसार झाला.
छायाचित्र दाखविल्यानंतर दिली कबुली
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी पुणे ग्रामीण व पौड पोलिसांशी संपर्क साधला. त्या वेळी शनिवारी पहाटे गोणवडी परिसरात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याचे पौड पोलिसांनी सांगितले. या मृतदेहाचे छायाचित्र अनिकेतला दाखविण्यात आले असता, मृतदेह सख्ख्या भावाचा असल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे आरोपीला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

