• Sat. Mar 7th, 2026
    बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, आठवडे बाजाराला निघालेल्या पती पत्नीवर काळाचा घाला; सुखी संसाराचा अंत

    Beed News : बीडमध्ये रस्ते अपघातात पती पत्नीचा करुण अंत झाला आहे. पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर बस आणि दुचाकीचा अपघात घडला. यात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    बीड : बीडमध्ये रस्ते अपघातात पती पत्नीचा करुण अंत झाला आहे. पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर बस आणि दुचाकीचा अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीवर आलेल्या पती-पत्नींना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

    मृत दाम्पत्य पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी येथील रहिवासी असून आज बाजाराचा दिवस असल्यामुळे ते बाजारासाठी निघाले होते. पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना रुग्णालयासमोर अचानक आलेल्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. बसचा क्रमांक MH- 14 X 7962 असा आहे. बाळू केशव वायकर आणि त्याची पत्नी लता बाळू वायकर हे धडकेनंतर रस्त्यावर दूर फेकले गेले आणि गंभीर दुखापतीमुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. सदरील बस ही नांदेड कडून पुण्याकडे जात असताना अपघात झाला. यात दोघेही जागेवर ठार झाले आहेत.
    Nashik Accident: खड्ड्यामुळे गेला तरुणाचा जीव; पडलेल्या दुचाकीस्वाराला कंटेनरने चिरडले, नाशिकमधील घटना
    पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. दाम्पत्याचे मृतदेह ताब्यत घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी रवाना केले. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

    अशाच एका दुर्दैवी घटनेची बातमी नवी मुंबईतून समोर आली आहे. महापे एमआयडीसी परिसरात एका हायड्रा चालकाने ट्रॅफिक कॉन्स्टेबलला चिरडले. या भीषण अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश पाटील असं या अपघातात मृत्यू झालेल्या पोलिसाचं नाव आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील हे रस्त्याच्या कडेला कर्तव्यावर तैनात होते. रस्त्याच्या कडेला उभे असताना यादरम्यान हायड्रा चालकाने वाहन उजव्या बाजूला वळवले. त्यावेळी कॉन्स्टेबल गणेश पाटील हे या वाहनाखाली आल्याने चिरडले गेले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा