म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: “राज्यात ४५ लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील भ्रष्टाचारामुळे गरीब घरातील मुलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न विरले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे घाबरलेल्या सरकारने दोन महिन्यांनी ‘एसआयटी’ नेमण्याची घोषणा केली. मात्र, भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या ‘एमपीएससी’च्या अध्यक्षाला हटविले नाही. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात लढा सुरू राहणार आहे,” अशी घोषणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. सरकारने नेमलेली ‘एसआयटी’ हा वेळकाढूपणा असल्याची टीकाही पवार यांनी केली.
स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी थांबवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांचा राजीनामा घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी आमखास मैदान ते विभागीय आयुक्तालय असा विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो परीक्षार्थी सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेले आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर सडकून टीका केली. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शप) प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, सक्षणा सलगर, नवीनसिंग ओबेरॉय, भूषण तांबे, मोहित जाधव, कुणाल खरात, प्रकाश इंगळे आदी उपस्थित होते.
“एमपीएससीचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे शाळेतील मित्र”
“एमपीएससीचा पेपर फुटल्याचे आणि भ्रष्टाचार झाल्याचे उघड होऊनही सत्ताधारी आमदार विद्यार्थ्यांच्या बाजुने बोलत नाहीत. हे आमदार लोकांच्या हितासाठी नाही तर स्वहितासाठी सत्तेत आहेत. कारण, कुणाही नेत्याचा मुलगा स्पर्धा परीक्षा देत नाही. स्पर्धा परीक्षा देणारी मुले शेतकरी, मजूर, रिक्षाचालक, लहान-मोठ्या व्यावसायिकांची आहेत. दोन दिवसांपूर्वी आयोगाने ‘गट क’ची परीक्षा जानेवारीत होणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात या परीक्षेचा पेपरसुद्धा फुटल्यामुळे सणासुदीचे कारण दिले आहे. ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे गरीब घरातील विद्यार्थ्यांनी शहरात तीन महिने कसे काढायचे ? एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाळेतील मित्र आहेत. आरटीओत असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या अधिकाऱ्याला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन हटवावे. पेपरफुटी प्रकरणात १५० दोषींची यादी दिली होती. पण, कारवाई फक्त नऊ लोकांवर झाली. कारण काही दोषी नेत्यांच्या संबंधातील होते. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे घाबरलेल्या सरकारने ‘एसआयटी’ स्थापन केली. आधीच्या इतर ‘एसआयटी’प्रमाणे वेळकाढूपणा केला जाईल,” असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
विद्यार्थी प्रतिनिधी दत्ता चव्हाण, ऋषीकेश पाटील, भारती, स्वप्नील खरात यांची भाषणे झाली. आम्ही पुस्तके वाचायची की आंदोलने करायची असा सवाल करत विद्यार्थ्यांनी भीमनवार यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी केली. सभेनंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
क्लासचालकांवर दबाव ?
विद्यार्थी आक्रोश मोर्चाला विद्यार्थ्यांना पाठवू नका म्हणून काही क्लासचालकांवर दबाव आणला गेला. मला क्लासचालकांनीच ही माहिती दिली. एक विद्यार्थी असेल तरी मोर्चा निघणार असे मी स्पष्ट केले. कारण हा लढा नेत्याचा नसून विद्यार्थ्यांचा आहे, असे रोहित पवार म्हणाले. मुंबईच्या बैठकीत मान्य झालेल्या मागण्या क्लासचालकांनी विद्यार्थ्यांना नक्की सांगाव्यात, असे आवाहनही पवार यांनी केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा