Vijaykumar Ghadge leaves for Mumbai : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना रविवारी झालेल्या मारहाणीनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आता या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. मारहाणीत जखमी झालेले विजयकुमार घाडगे हे रुग्णवाहिकेतून मुंबईकडे निघाले आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
विजयकुमार घाडगे यांना जागोजागी पोलीस प्रशासन अडविण्याचा प्रयत्न करत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष घाडगे यांनी पोलिसांना देखील इशारा दिला आहे, याचे परिणाम भोगावे लागतील. लातुरहुन मुंबईकडे जाताना विजयकुमार घाडगे यांनी सोलापूर तुळजापूर नाक्यावर रुग्णवाहिकेत झोपूनच प्रतिक्रिया दिली.
मंत्री माणिकराव कोकाटेंवर अजित पवारांनी मौन सोडलं, खडेबोल सुनावले, मोठी कारवाई करण्याच्या तयारीत?
अजित दादा नाही भेटले तर मुख्यमंत्र्यांकडे आणि राज्यपालांकडेही
लातूरच्या एका हॉस्पिटलमधून विजयकुमार घाडगे यांनी थेट ॲम्ब्युलन्समध्ये बसत मुंबईकडचा प्रवास सुरू केला आहे. तुळजापूरला आल्यानंतर घाडगे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी व सुरक्षा रक्षकांनी विजयकुमार घाडगे यांना रोखले. घाडगे तुळजापूरहून मुंबईकडे जाताना सोलापुरात काही वेळ विश्रांती घेत पुन्हा मुंबईला रवाना झाले. अजित दादांना भेटण्यासाठी निघालोय, दादा नाही भेटले तर मुख्यमंत्र्यांना भेटणार, असं विजयकुमार घाडगे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाही भेटले तर प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करणार.
‘सुनील तटकरेंनीच मला मारण्याचा कट रचला’
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच ऑनलाइन रमी खेळताना व्हिडीओ वायरल झाल्यानंतर सुनील तटकरे यांना निवेदन दिले. निवेदन देताना पत्ते दिले, त्यानंतर अर्ध्या तासानंतर मला मारहाण करण्यात आली. मारहाणीत माझा जीव गेला असता. पोलीस प्रशासन मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण याला पाठिशी घालत आहे. सुनील तटकरे यांनी मला मारण्याचा कट रचला होता, हाच जाब विचारण्यासाठी मी अजित दादांना भेटायला निघालोय, अशी प्रतिक्रिया विजयकुमार घाडगेंनी दिली आहे.

