• Sat. Jun 20th, 2026

    पंढरपुरातून मोठी बातमी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पाठवले सक्तीच्या रजेवर

    पंढरपुरातून मोठी बातमी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पाठवले सक्तीच्या रजेवर

    Pandharpur News : आषाढी वारीदरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन रांगेत पत्रा शेड आणि बॅरिगेटिंगच्या कामांसाठी ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा आरोप मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपांमुळे त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंदिर समितीने श्रोत्री यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अरुण बाबर, पंढरपूर : आषाढी वारीदरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन रांगेत पत्रा शेड. त्याचबरोबर बॅरिगेटिंग या कामांसाठी ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा आरोप मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यावर करण्यात आला होता. याबाबतचा एक व्हाईस रेकॉर्डिंग समोर आलं होतं. याच व्हाईस रेकॉर्डिंगवरुन मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी आता श्रोत्री यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत श्रोत्री यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा झाली. या बैठकीत मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

    या प्रकरणी आता सखोल चौकशी केली जाणार आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी खरंच ठेकेदारांकडून पैसे घेतले का याची चौकशी करण्यासाठी आता एक कमिटी नेमली जाणार आहे. ही कमिटी आठ दिवसांत चौकशी करुन योग्य तो निर्णय देणार आहे. या दरम्यान व्यवस्थापकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. कमिटीचा निर्णय येईपर्यंत मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या सविस्तर घटनेची चौकशी करून मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

    समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर नेमकं काय म्हणाले?

    “मंदिर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत अनेक लोकांच्या तक्रारी होत्या. या तक्रारी 26 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंतच्या तक्रारी होत्या. या तक्रारीत दोन-तीन महत्त्वाचे विषय होते. पहिला विषय हा पूर्ण मंदिराच्या यात्रेच्या काळात टेंटचा विषय होता. त्या संदर्भात मंदिर व्यवस्थापकांनी काही पैसे घेतल्याच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आज मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. ती समिती येत्या आठ दिवसांत सगळा अहवाल देईल”, अशी माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा