Pune News : भोंदूबाबाने गैरप्रकार केल्याचे वारंवार समोर येत आहे. अशातच पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एका भोंदू बाबाने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. सहकारनगर पोलिसांनी आरोपी भोंदू बाबाला अटक केली आहे.
पुण्याच्या धनकवडी परिसरात ही घटना घडली. वृत्तानुसार, फिर्यादी असलेली २५ वर्षीय तरुणी कायद्याचे शिक्षण घेते. तिच्या मैत्रिणीने अखिलेश राजगुरू हा ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतो, असे तिला सांगितले होते. १२ जुलैला ती आपल्या भावाची पत्रिका घेऊन त्या ज्योतिषाकडे गेली आणि इथेच ती फसली. ज्योतिषाने तिला सांगितले की, ‘तुमच्या भावाला एक खास वनस्पती द्यावी लागेल, ती मागवून घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा या.’
मंगळवेढ्यातील खून झालेल्या महिलेचं गूढ उकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे किरण-निशांतचं बिंग फुटलं
१८ जुलैला राजगुरूने तरुणीला ती वनस्पती घेण्याच्या बहाण्याने पुन्हा येण्यास सांगितले. त्यानंतर ती १९ जुलैला धनकवडी येथील भोंदूच्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालयात गेली. त्यावेळी त्याने तिला सांगितले, तुमच्या डोक्यावर ही वनस्पती ठेवून मंत्र म्हणावे लागणार आहेत. तरुणीला त्याचे वागणे गैर वाटले आणि ती तिथून निघण्याच्या प्रयत्नात होती. इतक्यात अखिलेश राजगुरूने अचानक तिला मिठी मारली आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
तरुणीने प्रसंग जाणून धैर्य दाखवत भोंदू ज्योतिषाला विरोध केला तिथून तातडीने निघाली. नंतर आपल्या भावाला फोन करून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तर ज्योतिषाविरोधात तिने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तात्काळ राजगुरूच्या कार्यालयावर छापा टाकला आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

