टेस्ला’ची पहिली धाव मुंबईत, BKC मध्ये मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन
अमेरिकेसह इतर देशांमधील ऑटोमोबाइल क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर बहुचर्चित ‘टेस्ला’ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात मंगळवारी पदार्पण केले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात एक प्रशस्त शो-रूम सुरू करत ‘टेस्ला’ आयएनसी या कंपनीने जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाइल बाजारपेठेकडे आपला मोर्चा वळवला.
