Solapur Crime News : सोलापूरच्या कुमठे गावात एका तलावात पडून तेरा महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी बाळाला शेतात पुरले, पण मामाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मृतदेह बाहेर काढला. अनैसर्गिक मृत्यूची शंका असल्याने शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतरच सत्य समोर येईल.
शेतात तेरा महिन्यांच्या बाळाला पुरले
कुमठे गावाच्या परिसरातील शेतात मामुरे यांचे एकत्र कुटुंब राहते. रविवारी सकाळी घरातील सर्व मंडळी कामात व्यस्त असताना सकाळी दहाच्या सुमारास विश्वनाथचे काका केदारनाथ हे बाहेरून घरी आले. त्यावेळी विश्वनाथ हा शेततळ्यात तरंगताना दिसला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण घटनेची सोलापूर जिल्ह्यात चर्चा होत आहे.
शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक करत शुद्धीकरण
मामाची तक्रार;माझ्या भाच्याचा अनैसर्गिक मृत्यू-
मृत झालेल्या बाळाचे मामा स्वप्नील धर्मराज भरमची (वय २५, रा. सोलापूर) यांनी ११२ वर फोन करुन विश्वनाथचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याची तक्रार केली. यामुळे पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहचले. त्यांनी याबाबत तहसीलदार हेडगीरे यांच्या परवानगीने रात्री पुरलेला मृतदेह बाहेर काढला, अशी माहिती सूत्रांनी दिली. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे हवालदार एस. टी. बहिर्जे उपस्थित होते. विश्वनाथच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवारी सकाळी होणार आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहे. संशयास्पद काही आढळल्यास कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

