Sanjay Raut on PM Modi : खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निवृत्तीच्या विधानावर भाष्य करताना, पंतप्रधान मोदींच्या ७५ वर्षांवरील निवृत्तीवरुन टीका केली. दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येणे हे देशासाठी शुभसंकेत असल्याचे राऊत म्हणाले.
संघ वारंवार त्यांना सूचना देतेय…
पुढे ते म्हणाले, ‘आता सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतात. त्यांची दाढीही पिकलेली आहे, डोक्यावरचे केसही उडालेले आहेत. जगभ्रमण करून झालं आहे. सत्तेची सगळी सुखं भोगली आहेत. ७५ वर्षांनंतर निवृत्तीचा जो नियम आपण केलेला आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना सूचना देतेय की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित होतात सोपवावा लागेल’.
Sanjay Gaikwad : ‘मला कसलाही पश्चाताप नाही, आमदार असलो तरी एक…’; कँटिन कर्मचाऱ्याला मारहाणीवर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया
दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येतात हे देशासाठी शुभसंकेत
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा निवृत्तीनंतरचा प्लॅन नुकताच सांगितला. त्यांनी ते नैसर्गिक शेती, अध्यात्माकडे वळणार असल्याचं म्हणाले. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यांनी ‘काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. निवृत्तीनंतर जीवनात अनेक गोष्टी करता येतात. अनेकजण आपापल्या भागात जाऊन सामाजिक कामं करत असतात. त्याविषयी चर्चा करण्याचं कारण नाही. पण या दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येतात हे देशासाठी शुभसंकेत आहेत.’
Chandrashekhar Bawankule: राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र लढण्याचा लोकांकडून दबाव
ठाकरे बंधू जवळपास १९ वर्षांनी एकत्र आले. मराठीच्या मुद्द्यावरुन दोघे भाऊ एकत्र आल्यानंतर ते आता निवडणुकही एकत्र लढणार असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ‘शिवसेना आणि मनसे दोघे एकत्र निवडणूक लढतील असं मी म्हणालो नाही. पण लोकांचा दबाव आहे, शिवसेना आणि मनसेने एकत्र येत निवडणुका लढवाव्यात, खासकरुन मुंबई महापालिका. ५ जुलै रोजी हे सर्वांनीच पाहिलं असेल की वरळीत दोघांची एकत्र विजयी रॅली झाली, त्यावेळी सर्वांनी पाहिलं असेल की त्यांची काय इच्छा आहे.’
संजय गायकवाडांचा आमदार निवासात राडा, कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, संजय राऊत संतापले
इंडिया आघाडी लोकसभेसाठी बनली होती. महाविकास आघाडी विधानसभेसाठी बनली होती. या दोघांची गरज स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक मुद्दे असतात. आमच्यावर दबाव आहे. लोकांची इच्छा आहे. मुंबईला वाचवायचं असेल, मराठी माणसाचा अधिकार ठेवायचा असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र लढावं लागेल असा लोकांचा दबाव असल्याचं संजय राऊत म्हणाले.

