Chandrapur Heavy Rain : चंद्रपुरात पूरपरिस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला
गेल्या तीन दिवसांपासून सोमवारच्या रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. सतत सुरू असलेल्या पावसाने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावाचा संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यांतील अनेक मार्ग सकाळपासून बंद पडले आहेत.
