राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर शिंदेंच्या आमदारांनी प्रतिक्रिया देत ठाकरे ब्रँडवर मोठ विधान केल. त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बाळासाहेब जिवंत असताना…
आमदार संजय गायकवाड यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले याबाबत विचारले असता, पंधरा वर्षांपूर्वी एकत्रित आले असते तर काही फरक पडला असता परंतु त्यांनी फार उशीर केला. आता ते एकत्रित आल्याने महाराष्ट्राला काही फरक पडेल, असे मला वाटत नाही.ठाकरे नावाचा ब्रँड जर असता बाळासाहेब जिवंत असतानाच 288 जागा निवडून आले असत्या. त्यावेळीही 70, 74 च्या पुढे शिवसेना जात नव्हती.आता हे दोन भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही वेळ निघून गेली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली.
…तर आपणास उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे
ते पुढे म्हणाले की, आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का, असा सवाल उपस्थित करून जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा रोखायचा असेल तर आपणास उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे आले असता ते बोलत होते.
मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे
हिंदी मराठी वादावर भाष्य करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जो कोणी महाराष्ट्रात मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे… मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये.

