• Mon. Mar 9th, 2026
    तेजस्विनी पंडित विजयी मेळाव्यात सहभागी, म्हणते, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे…

    Tejaswini Pandit on Uddhav Raj Thackeray Reunion : “आम्ही मराठीसाठीच आलेलो आहोत. मराठी भाषेचा जो विजय झाला आहे, जी वज्रमूठ मराठी माणसाने दाखवलेली आहे. त्याचा विजय साजरा करण्यासाठी आलो आहोत” असं तेजस्विनी पंडित म्हणाली.

    तेजस्विनी पंडित (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : त्रिभाषा धोरणात हिंदीसक्तीच्या विरोधातील निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडून आज वरळीत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मराठी कलाकारही हिरीरीने सहभागी झाले आहेत. सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव उपस्थित होते. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन तेजस्विनीने आनंद व्यक्त केला. सर्वात आधी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, मराठी माणसं एकत्र आली पाहिजेत, असं तेजस्विनी पंडित म्हणाली.

    तेजस्विनी पंडित काय म्हणाली?

    “आम्ही मराठीसाठीच आलेलो आहोत. मराठी भाषेचा जो विजय झाला आहे, जी वज्रमूठ मराठी माणसाने दाखवलेली आहे. त्याचा विजय साजरा करण्यासाठी आलो आहोत” असं तेजस्विनी पंडित म्हणाली.”ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे जी भावना संपूर्ण महाराष्ट्रात आहे, तीच भावना आहे. त्या भावनेपोटीच इथे आलो आहोत. तरुणांचा सहभाग चांगला आहे, मात्र अजून मराठी माणसांनी जोडलं गेलं पाहिजे, अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप विभागले गेले आहेत. सर्वात आधी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, राज्यातील मराठी एकत्र आले पाहिजेत” असं तेजस्विनी पंडित म्हणाली.

    “इथलं वातावरण काही लोकांनी बिघडवलं आहे, पण बिघडवण्यासारखं काहीच झालं नव्हतं. कारण आम्ही हिंदी विरोधी नाही” असंही तेजस्विनी म्हणाली.
    Uddhav Thackeray : जे सोडून गेले ते… उद्धव ठाकरेंनी चंग बांधला, ‘मातोश्री’वरुन आदेश निघाले, आता गद्दारांच्या विरोधात…

    सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया

    अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला, की ठाकरे बंधू एकत्र यावेत, याच गोष्टीसाठी मराठी माणूस वाट बघत आहेत. आता फक्त राज साहेबांना ऐकायचं आहे.

    नवीन गाडी घेतली, कार्यकर्ता थेट ‘शिवतीर्थ’वर पोहोचला; राज ठाकरेंच्या हस्ते पूजन, पुढे काय घडलं?

    Raj Uddhav Thackeray Reunion : मनसेचं ऑफिस, ठाकरेसेनेच्या नेत्याचा ‘मनसे’ सत्कार; ‘मामां’च्या हकालपट्टीनंतर चमत्कार

    भरत जाधवही कडाडले

    दरम्यान, अभिनेते भरत जाधव म्हणाले, की आपल्याच राज्यात राहून आपणच अपमानित होतोय ही चुकीची गोष्ट आहे, हे व्हायला नको, प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करतोय, मराठी माणसाने जागं व्हायला हवं, मराठी बाणा जपायला हवा, आपण हिंदीच्या विरोधात नाही, हिंदीही चांगलीच आहे, फक्त सक्ती नको, इतकंच मत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा