Pair Of Bulls Given To Old Farmer : ‘क्रांतिकारी’च्या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील वर्गणीतून बैलजोडीचे केलेले साह्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. हा भावनिक क्षण होता. यावेळी त्या माऊलीने रविकांत तुपकरांशी फोन वरून संवाद साधला आणि आपली भावना व्यक्त केली.
पावसाळी अधिवेशनातही मुद्दा गाजला
अंबादास पवार हे अहमदपूर तालुक्यातील हडोळतीचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे २ एकर ९ गुंठे शेती आहे. बैल नसल्यामुळे ते स्वतःच औताला जुंपून शेती करत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकजण मदतीसाठी पुढे आले. पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. कृषीमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही.
मराठीचा नारा एकत्र घुमणार! ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा, दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी, कोण-कोण उपस्थित राहणार?
विषय गांभीर्याने घेतला
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी या गोष्टीची दखल घेतली. त्यांनी लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बैलजोडीसाठी पैसे जमा करायला सांगितले. चार दिवसांत १ लाख रुपये जमा झाले. मग कार्यकर्त्यांनी वाजतगाजत बैलजोडी अंबादास पवार यांच्या घरी नेऊन दिली. कार्यकर्त्यांनी बैलांना औताला जुंपून शेती करायलाही मदत केली. तुपकर म्हणाले, “शेतकऱ्याची होणारी दैना पाहता हा विषय गांभीर्याने घेतला.”
दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले
‘क्रांतिकारी’च्या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील वर्गणीतून बैलजोडीचे केलेले साह्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. हा भावनिक क्षण होता. यावेळी त्या माऊलीने रविकांत तुपकरांशी फोन वरून संवाद साधला आणि आपली भावना व्यक्त केली. ‘मला वाटत नव्हते की माझ्या धन्याच्या खांद्यावरील जू उतरेल. पण ते तुम्ही उतरविले. तुमचे उपकार आहेत. तुमचा मदतीचा हात मिळाल्याने आमचे आयुष्य वाढले.’ या शब्दांत रविकांत तुपकर यांचे आभार मानले.
Uday Samant : शिंदेंच्या जय गुजरातवरून वाद! सामंतांनी सांगितला 10 वर्षांपूर्वी शरद पवारांच्या जय कर्नाटकचा किस्सा, काय म्हणाले…
तुपकरांचे अभिवचन
“राज्यातील कोण्याही शेतकऱ्यास अडचण असेल तर संघटना धावून जाईल. सरकारने घोषणा केल्या. मात्र ते मदत करू शकले नाही. अभिनेता सोनू सूद यांनीही मदतीची घोषणा केली आहे. शेतकरी जगला पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत. तुम्ही धन्यवाद मानू नका. आमचे कर्तव्य आहे. कुठलीही अडचण आल्यास संपर्क करा. तुम्ही एकटे नाहीत. मी कायम तुमच्या पाठीशी आहे” असे अभिवचन रविकांत तुपकर यांनी आभार मानणाऱ्या पवार दाम्पत्याला दिले.

