• Tue. Sep 22nd, 2026
Thackeray Brothers Mega Victory Rally : उद्धव ठाकरे-राज ठाकरे विजयी मेळावा Live Updates

|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Raj Thackeray and Uddhav Thackeray mega Victory gathering Rally : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा आज वरळी डोम इथे होत असून हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.

महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला. हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत याविरोधात आंदोलन करत ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलं. पण या मोर्चाआधीच सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय, याबाबतचा जीआर रद्द केला. त्यानंतर आता आंदोलनाच्या ठरलेल्या दिवशीच आज शनिवारी ५ जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्रितपणे विजयी मेळावा साजरा करणार आहेत. ठरलं… ५ जुलै, मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे येत आहेत… आज वरळी डोम इथे विजयी मेळावा साजरा होणार आहे. मराठीसाठी, हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू जवळपास २० वर्षांनी एकत्र आले आहेत.

LIVE UPDATES

  • 08:53 AM, Jul 05 2025

    Thackeray Brothers Reunites For Marathi : ठाकरें बंधूंचे एकत्रित पोस्टर

  • 08:42 AM, Jul 05 2025

    Sandip Deshpande : आवाज मराठीचा… संदीप देशपांडे यांची खास पोस्ट

  • 08:39 AM, Jul 05 2025

    Rohit Pawar on Thackarey Mega Victory Rally : मराठी माणसाच्या विजयी जल्लोषाला मनःपूर्वक शुभेच्छा

  • 08:37 AM, Jul 05 2025

    Sanjay Raut : खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी २७ जून रोजी महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी घोषणा करत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं सांगितलं जाहीर केलं होतं.

  • 08:34 AM, Jul 05 2025

    Thackeray Brothers Reunites for Marathi Cause : मराठी भाषेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भाषेचं समर्थन करण्यासाठी हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू २० वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहेत.

  • 08:31 AM, Jul 05 2025

    Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित विजयी मेळावा वरळी डोम इथे पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed