Chhatrapati Sambhajinagar Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला. काळा गणपती मंदिराजवळ भरधाव कारने दर्शनासाठी आलेल्या लोकांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिराच्या परिसरात दुःखद घटना घडली. एका वेगवान कारने निष्पाप नागरिकांना चिरडले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही लोकांना कारने धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोन लोकांचा जागेवरच मृत्यू झाला. “मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोघांचा यात जागीच मृत्यू झाला,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इतर ४ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघात नेमका कसा झाला हे दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात आहे. भरधाव चार चाकी चालकाने पाच ते सहा जणांना उडवले #Sambhajinagar #Accident #ViralVideo pic.twitter.com/CsoJFHq0og
— Maharashtra Times (@mataonline) July 4, 2025
Chhatrapati Sambhajinagar : घराच्या छतावर गेली, केबलला हात लागला आणि आक्रीत घडलं; १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी शेवट
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

