Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर, एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेत ‘शिवकोष’ ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालये आणि शाखांचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवकोष ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालयं, शाखा यांचं व्यवस्थापन शिवकोष ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येईल. शिवसेनेचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांनी याबद्दलची घोषणा केली.
आम्ही शिवकोष नावानं निधी गोळा केला असून त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कार्यालयांची उभारणी केली जाईल, असं शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरात आम्ही एक कार्यालय उभारलेलं आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात त्याच धर्तीवर कार्यालयांची उभारणी केली जाईल. त्यांचा वापर पक्षाचा संदेश पोहोचवण्यासाठी होईल. या कार्यालयांची मालकी शिवसेनेकडून चालवल्या जाणाऱ्या ट्रस्टकडे असेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली. उद्धव ठाकरेंच्या चुकांमधून शिंदे बरेच धडे घेत असल्याचं यावरुन दिसत आहे. शिंदे यांच्याआधी अनेक बलाढ्य नेत्यांनी शिवसेना सोडली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे २००५ मध्ये सेनेतून बाहेर पडले. तेव्हा त्यांच्या समर्थक नीलम डोळस यांनी चेंबूर स्थानकाजवळील शिवसेना शाखेवरील ताबा सोडण्यास नकार दिला. या कालावधीत सेनेनं आणखीही काही शाखा गमावल्या.
Eknath Shinde | मुख्यमंत्री असताना संपलेला पक्ष म्हणून हिणवलं आणि युती करायला निघालेत
२०२२ मध्ये शिंदे यांनी सेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड केलं. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील शिवसैनिकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शाखांवर दावे केले. कारण या शाखा त्यांच्या मालकीच्या होत्या. खुद्द शिंदे यांनी त्यांचे राजकीय गुरु आनं दिघे यांच्या आनंद आश्रमाचं रुपांतर पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात केलं.

