Ekvira Devi Temple New Dress Code : कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कपड्यांबाबत नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भक्तांना आता प्रवेश मिळणार नाही. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ७ जुलैपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.
७ जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार
एकविरा आईचं आणि मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी ही बंदी घालण्यात आली असून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलै पासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.
कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरात ड्रेस कोड लागू
शुक्रवारी कार्ला येथे आई एकविरा देवीच्या मंदिरात विश्वस्थ मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोड संदर्भात हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.
नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच? पंढरपूरमध्ये VIP दर्शनावर बंदी असताना शिंदेंच्या आमदाराकडून सोय करण्याची मागणी
अंग प्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत
कार्ला येथील एकविरा आई लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असून राज्यासह देशातील अनेक ठिकाणाहून भक्त देवीच्या दर्शनाला येतात. मात्र काही भक्त अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून दर्शनाला येतात, त्यामुळे देवीचं तसंच मंदिराचं पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी विश्वस्थ मंडळाकडे आल्या होत्या. अनेक भक्तांनी सोशल मीडियाद्वारे ड्रेस कोड संदर्भात मागणी केली केली होती. भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्थ मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.
Unique Village : फक्त महाराष्ट्र नव्हे, आशिया खंडातील एकमेव गाव; जिथं एकही वाहन नाही!
कोणत्या कपड्यांना बंदी?
शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पँट आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना बंदी घालण्यात आली आहे.
महिला-मुलींनी कोणते कपडे घालावेत?
महिला आणि मुलींनी साडी, सलवार कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावेत ज्याने पूर्ण अंग झाकलेलं असावं. कोणतेही अंग प्रदर्शन करणारे कपडे घालता येणार नाहीत.
पुरुष, मुलांसाठी काय पेहराव?
धोतर, कुर्ता पायजमा, पँट शर्ट, टी शर्ट आणि इतर पारंपरिक कपडे ज्याने पूर्ण अंग झाकलेलं असावं.
Ekvira Devi Temple : कार्लाच्या एकविरा आईच्या भक्तांसाठी मोठी बातमी: मंदिरात ड्रेस कोड लागू, ७ जुलैपासून नवी नियमावली
भक्तांशी वाद घालणाऱ्या मंदिरातील कर्मचाऱ्यांना देखील दिल्या सूचना
एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घेताना येथील कर्मचारी भक्तांवर आरडा-ओरड करत असून भक्तांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी देखील विश्वस्थ मंडळाकडे आल्या होत्या. मंदिरातील कर्मचाऱ्यांनी देवी भक्तांशी वाद न घालण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे. एकविरा आईच्या भक्तांनी देखील देवीचं दर्शन घेताना मंदिरातील सूचनांचं पालन करावं, असं आवाहन देखील ट्रस्टचे प्रमुख विश्वस्थ खासदार बाळ्या मामा यांनी देवी भक्तांना केलं आहे.

