• Tue. Jun 16th, 2026

    सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी

    ByMH LIVE NEWS

    Jun 29, 2025
    सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी




    सातारा दि.: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाहणी करून वारकऱ्यांची संवाद साधला.

    सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यामध्ये ठिकठिकाणी आरोग्य केंद्र उभारून वारकऱ्यांना औषध उपचारासह इतर सुविधा देण्यात येत आहेत याबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले.

    यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून आरोग्यसेवा चांगल्या मिळत आहेत का याबाबत विचारणाही केली. यावर वारकऱ्यांनी आरोग्य, निवास सुविधा चांगल्या मिळत असल्याचे सांगितले.







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed