• Mon. Jun 29th, 2026

    लातूर शहरातील ‘नारायणा ई-टेक्नो स्कूल’चा बोगस कारभार, शाळेवर मनसेचा हातोडा

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2025
    लातूर शहरातील ‘नारायणा ई-टेक्नो स्कूल’चा बोगस कारभार, शाळेवर मनसेचा हातोडा

    Latur News : लातूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून नारायणा ई-टेक्नो स्कूल ही शाळा शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता नसतानाही सुरू आहे. मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण व सहकारी यांच्याकडून शाळा प्रशासनाविरोधात खळखट्याक आंदोलन करण्यात आले.

    (फोटो– Lipi)

    ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून नारायणा ई-टेक्नो स्कूल ही शाळा शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता नसतानाही सुरू आहे. यावर अनेकवेळा निवेदने देऊन व आंदोलन करूनही शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन या शाळेवर काहीही कार्यवाही करायला तयार नाहीत. त्यामुळे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण व सहकारी यांच्याकडून शाळा प्रशासनाविरोधात खळखट्याक आंदोलन करण्यात आले.

    नारायणा ई-टेक्नो स्कूलला कोणतीही शासन मान्यता नाही. या शाळेकडून लातूर जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल करून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 75 हजार ते एक लाख रुपये फी आकारून ऍडमिशन घेणे सध्या जोरात सुरू आहे. मनसेच्या निवेदनावरून शिक्षण विभागाने या शाळेला भेट देऊन चौकशी केली असता ही शाळा शासन मान्यतेशिवाय सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्याही निदर्शनास आले आहे.

    ही सर्व स्थिती पाहता शिक्षण विभागाने दिनांक १० जानेवारीला या शाळेला अनधिकृत म्हणून घोषित केले होते. तर ही शाळा तात्काळ बंद करावी, तसेच शाळेत नवीन प्रवेश घेऊ नयेत व ज्या विद्यार्थ्यांचे या शाळेत प्रवेश घेतले गेले आहेत, त्यांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करावे, असे सक्त आदेश देऊन शाळेत दंड ठोठावला होता. तरीही या शाळेच्या शाळा व्यवस्थापनाने ही शाळा सुरूच ठेवली व नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू ठेवली. यामुळे संतप्त मनसैनिकांनी शाळेवर हातोडा चालवला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed