• Mon. Mar 9th, 2026
    वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा, मराठवाड्यात अवकाळीचा फटका

    Maharashtra Weather Forecast : राज्यात होळीनंतर हवामानात मोठा बदल झाला असून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने सहा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर इतर भागांमध्ये येलो अलर्ट आहे. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसतोय. होळीनंतर राज्यातील वातावरण पूर्ण बदलून गेले. हेच नाही तर होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत असताना अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. अवकाळीचे ढग मागील काही दिवसांपासून राज्यावर आहेत. अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेल्याचे चित्र देखील दुसरीकडे आहे. अवकाळी पावसाचा अनेक भागांमध्ये मोठा फटका बसलाय. मराठवाड्यात काल गारपिट झालीये. आताही पावसासोबतच गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.

    अवकाळी पावसाचा विदर्भासह मराठवाड्याला फटका

    काल राज्यात अवकाळीचा फटा बसला. अनेक भागांमध्ये दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. आजही काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस बघायला मिळतोय. काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन असल्याची परिस्थिती राज्यात आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यासोबतच गारपिटीचाही मोठा फटका बसलाय.
    Maharashtra Weather Update : विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज, मराठवाड्यातही अवकाळीवादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट

    आता हवामान खात्याकडून मोठा इशारा हा देण्यात आलाय. सहा जिल्हांमध्ये तुरळक वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बाकी भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. विदर्भासह मराठवाड्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने नागरिकांचीही मोठी धावपळ झाली. परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, नाशिक, नंदुरबार याठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

    मे महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने झोडपले

    कमी हवामानाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाला पोषक असे वातावरण बघायला मिळतंय. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्णता वाढताना दिसत आहे. काही शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचे संकेत आहेत. मुंबईमध्ये अवकाळी पावसाचे आगमन झाले. मुंबईतील बऱ्याच ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अवकाळी पावसामुळे काही शहरांमध्ये ढगाळ वातावरणही असेल. पुढील तीन ते चार दिवस काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा भर उन्हाळ्यात राज्यात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पावसामुळे फळ बागांचे नुकसान झालंय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed