• Tue. Jun 9th, 2026
    लिफ्टने 17व्या मजल्यावर गेली अन्… कल्याणमध्ये 35 वर्षीय महिलेने आयुष्य संपवलं

    Kalyan Woman Ends Life: कल्याणमध्ये एका महिलेने इमारतीच्या १७व्या मजल्यावरुन उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. ही महिला या इमारतीची रहिवासी नसून ती बाहून आली असल्याची माहिती आहे.

    (फोटो– Lipi)

    प्रदीप भणगे, ठाणे: कल्याण योगिधाम परिसरात एका इमरतीच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारत 35 वर्षीय महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. ही महिला या इमारतीमध्ये राहत नसून ती बाहेरून इमारतीमध्ये आल्याचे माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ही महिला लिफ्ट ने 17 व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण योगिधाम परिसरात एका इमारतीच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारत 35 वर्षीय महिलेने आपलं आयुष्य संपवलं. ही घटना काल (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. ही महिला या इमारतीमध्ये राहत नसून ती बाहेरून इमारतीमध्ये आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ही महिला लिफ्टने 17व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ही महिला कुठे राहत होती? ती या इमारतीमध्ये का आली? या महिलेने हे टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास पोलीस करत आहेत.

    या घटनेबाबत माहिती देताना योगिधाम फेडरेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितलं की, दुपारच्या सुमारास मला फोन आला होता. मी इमारतीजवळ येऊन पाहिलं तर एका महिलेने 17 व्या मजल्यावरून उडी मारली होती. नंतर माहिती घेतली असता, ती अनोळखी महिला होती. ती बाहेरून आली होती. ती येथील रहिवासी नाही, अशी माहिती समोर आली आहे.

    या कॉम्प्लेक्समध्ये ही महिला बाहेरून आली होती. ती अगदी शांतपणे लिफ्टमधून 17व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. त्यानंतर तिने उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed