Thane Ghodbandar Road : ठाण्याजवळील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. यामुळे घोडबंदरच्या दिशेने होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २५ एप्रिलला सुरू झाले आणि ते काही दिवसांत पूर्ण झाले.
घाटातील उर्वरित कामाचे नियोजन येत्या आठवड्यात केले जाणार असून या काळात वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या घाट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते.
Pahalgam Attack : पाकिस्तानींसाठी मुदतवाढ, भारताचा मानवतावादी निर्णय; परतण्यासाठी पुढील आदेशापर्यंत कालावधी, ७८६ जणांची भारत सोडला
मात्र पावसाळा सुरू होताच काही दिवसांत घाटातील रस्त्याची अवस्था खड्यांमुळे बिकट होते. ही कोंडी टाळण्यासाठी यंदा शुक्रवार, २५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून येथील डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली. २९ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र डांबरावर प्रक्रिया करणाऱ्या प्लांटमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील अवजड वाहनांचा विशेष दोन दिवसांसाठी म्हणजेच गुरुवार रात्री ११.५५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला होता. तो ब्लॉक पूर्ण होण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमने घाटातील रस्ता दुरुस्ती मोहीम फत्ते केली. त्यामुळे कित्येक तास कोंडीत अडकणाऱ्या वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Coastal Road : नरिमन पॉइंट ते दहिसर प्रवास सुस्साट, १८ मार्गिका वाहन चालकांच्या सेवेत येणार; कुठून, कसा असेल मार्ग?
अभियंते, कामगारांची टीम
मुंबई आयआयटीचे सहा अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे १५ अधिकारी कर्मचारी आणि २० ते २५ कामगारांच्या मदतीने पाच ते सहा दिवसांत ही मोहीम पार पडली. दिवसरात्र हे काम सुरु होते. या काळात सहाशे मीटर मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले असून येत्या आठवड्यात ‘मायक्रो सरफेसिंग चे कामही वाहतुकीला अडथळा न होता पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Thane News : अवजड वाहनांची कोंडी फुटणार, घोडबंदरच्या गायमुख घाटाची दुरुस्ती मोहीम फत्ते; वाहन चालकांना दिलासा
उन्हाच्या दाहकतेने काम मंदावले
या कामादरम्यान प्रचंड उन्हाच्या झळांमुळे रस्त्याच्या डांबरीकरण कामावर मोठा परिणाम झाला. कामगारांना दुपारच्या उन्हात तप्त डांबर टाकून रस्त्याचे पुष्टीकरण करणे, अशक्य होते. अन्यथा हे काम याआधीच पूर्ण होण्याची शक्यता होती, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

