Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यातून जालन्यातील राऊत कुटुंब थोडक्यात बचावलं. राऊतनगरमध्ये राहणारे संजय राऊत त्यांचा मुलगा आदर्श आणि पत्नी सोबत काश्मीरला गेले होते.
पहलगाममध्ये असताना आदर्श राऊत एकटेच घोडेस्वारीसाठी गेले. ते खोऱ्यात फिरत होते. बैसरन खोऱ्यात एका मॅगीच्या स्टॉलवर थांबलेले असताना एका अनोळखी व्यक्तीनं त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही काश्मिरी वाटत नाही. तुम्ही हिंदू आहात का?, असा प्रश्न अनोळखी व्यक्तीनं आदर्श यांना विचारला. तेव्हा आदर्श राऊत यांना काहीसा संशय आला. मी इथलाच रहिवासी असल्याचं उत्तर राऊत यांनी दिलं.
Pahalgam Terror Attack: पाकची महाकोंडी; जमिनीपासून आकाशापर्यंत बॅन; समुद्रातही पाणी पाजण्याची तयारी, प्लान काय?
आदर्शनं समोरच्या व्यक्तीला फारसं महत्त्व दिलं नाही. त्यामुळे तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला राऊत कुटुंब श्रीनगरला गेलं. त्याच दिवशी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे फोटो समोर आले. तेव्हा आदर्शनं त्यातील एकाला ओळखलं. त्याच व्यक्तीनं आदर्शशी बातचीत केली होती. जालन्याला परतल्यानंतर आदर्शनं ईमेलच्या माध्यमातून ही माहिती एनआयएला दिली. त्यात त्यांनी संशयितासोबत झालेल्या संवादाचा संदर्भ दिला.
Pahalgam Terror Attack: ट्रेनमध्ये देशभक्ती नको दाखवू! २९वा नंबर तुझा लागेल! पहलगाम हल्ल्याचे रील पाहणाऱ्याला मारहाण
२१ एप्रिललादेखील दहशतवादी पहलगाममध्येच होते. पण त्यावेळी तिथे पर्यटक कमी होते. त्यामुळेच त्यांनी हल्ल्यासाठी पुढचा दिवस निवडला असावा, अशी शक्यता आदर्श यांनी बोलून दाखवली. जिथे हल्ला झाला, तिथे पोलीस किंवा सुरक्षा दलाचे जवान नव्हते. तिथे सुरक्षा असती, तर हल्ला झाला नसता, असं आदर्श यांचे वडील संजय राऊत म्हणाले.
भारत हवाई हद्द बंद करण्याच्या तयारीत
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आठवडा उलटला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृ्त्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सरकारांनी एकमेकांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. यानंतर आता भारत सरकार पाकिस्तानी एअरलाईन्ससाठी आपली हवाईहद्द बंद करण्याच्या विचारात आहे.

