• Wed. Mar 11th, 2026
    मराठवाड्यात असणार उष्ण आणि दमट वातावरण, विदर्भात पावसाचा इशारा

    Maharashtra Weather Forecast : राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. होळीनंतर उष्णता वाढेल असा अंदाज होता, पण अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला, पिकांचे नुकसान झाले. हवामान खात्याने विदर्भात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे, तर कोकण आणि मुंबईमध्ये वातावरण सामान्य राहील.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस ते कधी ऊन अशी स्थिती राज्यात आहे. उष्णता वाढण्याचे संकेत असतानाच आता परत एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे ढग दिसत आहेत. होळीनंतर राज्यामध्ये उष्णता वाढणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि मोठा फटका पिकांना बसला. हेच नाही तर नाशिकमध्ये जोरदार गारपिट झाली आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला अनेक ठिकाणी पाऊस झाला.

    विदर्भावर अवकाळीचे संकट

    मागील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये पारा वाढताना दिसला. मात्र, आता परत पावसाचा इशारा काही भागांमध्ये देण्यात आलाय. दुसरीकडे काही शहरांमध्ये पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना देखील दिसतोय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा फटका बसला आहे. राज्यामध्ये अजूनही पावसाला पोषक वातावरण असल्याचे बघायला मिळतंय. आता हवामान खात्याकडून मोठा इशारा देण्यात आलाय.

    मराठवाडा आणि विदर्भाला इशारा

    विदर्भात तापमान वाढताना दिसतंय. विदर्भातील काही शहरांमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद देखील करण्यात आलीये. आता विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पुढील चार दिवस वर्तवण्यात आलीये. फक्त विदर्भच नाही तर मराठवाड्यात देखील. कोकण आणि मुंबईमध्ये वातावरण सामान्य राहिला. इतर अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची देखील शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, बीड, अकोला, नांदेड, चंद्रपूर, सांगली, सातारा, जळगाव, सोलापूर या भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.

    अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण

    अनेक भागांमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. ढगाळ वातावरणामुळे हवामानातील उकाडा वाढलाय. एप्रिल महिना संपत असताना देखील राज्यात पाऊस हजेरी लावताना दिसतोय. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशिव येथे पावसाला पोषक वातावरण पुढील चार दिवस असणार आहे. परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना येथे उष्ण आणि दमट हवामान असण्याची शक्यता आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed