• Thu. Sep 10th, 2026

पहलगाम अतिरेकी हल्ल्या संदर्भातील सर्व पुरावे भारताने जगासमोर मांडले

ByMH LIVE NEWS

Apr 27, 2025
पहलगाम अतिरेकी हल्ल्या संदर्भातील सर्व पुरावे भारताने जगासमोर मांडले

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी सकाळी ( २२ एप्रिल २०२५ ) झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांच्या मागे पाकिस्तानाच्या असलेल्या रोल संदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाई सुरु केली आहे. भारताने परदेशी सरकारांच्या समोर तांत्रिक आणि मानवी खबऱ्यांबाबत मिळालेले गुप्तचर पुरावे सादर केले आहेत. यातून या मागे पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांचा थेट रोल असल्याचे पक्के पुरावे भारताने सादर केले आहेत.

भारतीय तपास यंत्रणांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अतिरेक्यांची ओळख पटवली आहे. तपासात या हल्ल्यात सामील अतिरेक्यांचा थेट संबंध ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ (TRF) बरोबर असल्याचे उघडकीस आले आहे. TRF ही संघटना लष्कर ए तैयबाशी संबंधित शाखा आहे. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्समध्ये या अतिरेक्यांचे सिग्नल पाकिस्तानच्या दोन ठिकाणांशी जुळलेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसातच अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, जपान, इस्रायल, इटली, इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, नेपाळ, मॉरीशस, डच आणि ऑस्ट्रेलिया सारख्या १३ देशांच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे. सर्व नेत्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आणि भारताला पाठींबा दिला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील परराष्ट्र मंत्री आणि डिप्लोमेटीक अधिकाऱ्यांशी संवाद साधात भारताची बाजू मांडली आहे.

Image
Image

सिंधू पाणी करार रद्द: आता पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही असा इशारा केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी दिला आहे.

राजनैतिक संबंध तोडले: पाकिस्तानशी राजनैतिक संबंध आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे.

व्हिसा सेवा रद्द केल्या : पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ प्रभावाने निलंबित करीत, पाकिस्तानी हिंदूंना राहण्याची सूट दिली आहे.

नियंत्रण रेषेवर प्रत्युत्तर : भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

भारताचा संदेश: “पर्यटक संपूर्ण सुरक्षित ”

दिल्लीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी 30 हून अधिक देशांच्या डिप्लोमेटीक अधिकाऱ्यांशी भेट घेत भारतात परदेशी पर्यटक संपूर्ण सुरक्षित असल्याचे आश्वस्त केले आहे. अमेरिका आणि ब्रिटेनने जारी केलेल्या पर्यटकांच्या सूचनांना भारताने “अनावश्यक आणि अतिशयोक्तिपूर्ण” म्हटले आहे.

संपूर्ण जगाचा भारताला पाठींबा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला “भयानक” असल्याचे म्हटलं आहे आणि भारत आणि पाकिस्तान संवादाद्वारे हा प्रश्न सोडवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी इराण आणि सौदी अरेबियाने दाखवली आहे. फ्रान्स, इस्रायल, जपान, इटलीसह अनेक देशांनी दहशतवादाविरुद्ध भारतासोबत आम्ही उभे आहोत असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed