• Wed. Mar 11th, 2026

    पाकड्यांची आता खैर नाही, भारतीय नौदलाने भरवली पाकिस्तानच्या उरात धडकी, प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज

    पाकड्यांची आता खैर नाही, भारतीय नौदलाने भरवली पाकिस्तानच्या उरात धडकी, प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Apr 2025, 12:18 pm

    Indian Navy News : भारतीय नौदलाने गेल्या काही दिवसांत अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे, ज्याचा उद्देश त्यांच्या युद्धनौका, शस्त्रास्त्र प्रणाली आणि नौदल कर्मचाऱ्यांच्या लांब पल्ल्याच्या अचूक प्रहार क्षमतेची चाचणी आणि बळकटीकरण करणे आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करी पातळीवरही बरीच हालचाल दिसून येत आहे. मैदानी भागात तसेच सागरी क्षेत्रातही तणाव कायम आहे. तणावपूर्ण वातावरणात, भारतीय नौदलाने लांब पल्ला गाठून हल्ला करण्याच्या क्षेपणस्त्रांच्या क्षमतेची यशस्वी चाचणी करून पाकिस्तानला एक सज्जड इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.

    भारतीय नौदलाने गेल्या काही दिवसांत अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे, ज्याचा उद्देश त्यांच्या युद्धनौका, शस्त्रास्त्र प्रणाली आणि नौदल कर्मचाऱ्यांच्या लांब पल्ल्याच्या अचूक प्रहार क्षमतेची चाचणी आणि बळकटीकरण करणे आहे.

    “भारतीय नौदलाच्या जहाजांनी अनेक यशस्वी अँटी-शिप फायरिंग केले आहेत. जेणेकरून ते लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमक हल्ल्यांसाठी प्लॅटफॉर्म, सिस्टीम आणि क्रू ची तयारी पुन्हा सत्यापित आणि प्रदर्शित करतील. भारतीय नौदल कधीही, कुठेही, कोणत्याही प्रकारे आपल्या सागरी हितांचे रक्षण करण्याकरिता युद्ध करण्यासाठी सज्ज आहे.” असे या चाचणीबद्दल भारतीय नौदलाने म्हटले. या चाचणीद्वारे, भारताने हे स्पष्ट केले आहे की भारतीय नौदल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे “लढाईसाठी सज्ज, विश्वासार्हता आणि भविष्याकरिता सज्ज” आहे.

    ही चाचणी धोरणात्मक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. नियंत्रण रेषा (LOC) आणि सागरी सीमेवर तणाव कायम असताना भारतीय नौदलाने केलेली ही चाचणी पाकिस्तानसाठी एक मजबूत संदेश आहे. भारतीय नौदलाने हे देखील स्पष्ट केले आहे की भारत आपल्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी “कोठेही, कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत” प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. अलिकडच्या घडामोडी पाहता, ही चाचणी धोरणात्मक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जात आहे.

    २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यात सर्व पुरुष होते आणि बहुतेक विदेशी पर्यटक होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करून महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed