Mumbai Police: मुंबई पोलिस दलाच्या शिस्तीस व लौकिकास मोठया प्रमाणात बाधा पोहोचविणारे अशोभनीय कृत्य असल्याचा ठपका ठेवत दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
हायलाइट्स:
- पैसे न दिल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण
- पोलिस दलास अशोभनीय कृत्य असल्याचा ठपका
पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या हॉटेल कर्मचाऱ्याने वैद्यकीय तपासणी करीत पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. त्याच्या तक्रारीची नोंद डायरीत नोंद करून घेण्यात आली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांकडून संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये सत्यनारायण शिंदे आणि संदीप कोळी या दोघांनी पैशासाठी मारहाण केल्याचे दिसून आले. त्यांचे हे कृत्य ही अतिशय गंभीर बाब असल्याचे नमूद करीत दोघांनाही पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले.
निलंबनाच्या काळात त्यांना खासगी नोकरी अथवा खासगी व्यवसाय करू नये तसेच मुंबईची हद्द सोडून जाऊ नये असे बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर दररोज हजेरी आणि दर शुक्रवारी सकाळी साप्ताहिक कवायतीसाठी नायगांव पोलिस मुख्यालय येथे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

