Yavatmal water at Kathora Pardhi Beda : यवतमाळमध्ये पाण्यासाठी १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून काठोडा पारधी बेड्यावर हातपंपातून पाण पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
Yavatmal News : पाण्यासाठी जीव गेला, मुलीच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे; आता काठोडा पारधी बेड्यावर पोहचले पाणी
गावातील हातपंप नादुरुस्त झाल्याने महिलांना अरुणावती नदीवर पाणी भरण्यास आणि कपडे धुण्यास जावे लागत होते. १३ एप्रिल रोजी वेदिका नुरेश चव्हाण (वय १२) ही मुलगी आपल्या आजीसोबत नदीवर गेली असता तिचा नदीत बडून मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची फारशी गंभीर दखल प्रशासनाने घेतली नाही. मृत्यूचा अहवाल तयार करण्यात आला. पण बेड्यावरील पाण्याची समस्या कायमच होती. त्याची दखल घेण्यात आली नाही. पण याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच या घटनेला वाचा फुटली.
Pune News : कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?
शनिवारी सर्व अधिकारी काठोडा पारधी बेड्यावर पोहचले. वेदिकाच्या आईवडिलांची त्यांनी भेट घेतली. तातडीने धावपळ करून गावातील हातपंप सुरू केला. आपल्या मुलीचा पाण्यासाठी जीव गेल्यानंतर आता अधिकाऱ्यांना जाग आली, अशी प्रतिक्रिया वेदिकाच्या वडिलांनी दिली आहे.
Yavatmal News : पाईपलाईन आली पण पाणीच नाही, ‘हर घर जल’ योजना अंगणी, तरी १२ वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यासाठी जीव गेला
सरकारी अनास्थेचा बळी –
वेदिका चव्हाण या मुलीचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आणि सरकारी अनास्थेचा आणखी एक बळी गेल्याचं समोर आलं. या भागातील महिला तसंच मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर जात जीव धोक्यात घालून पाणी आणावं लागतं. पण याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं. वेदिकाच्या मृत्यूनंतर येथील पाण्याचं भीषण वास्तव समोर आलं आणि प्रशासनाला खडबडून जाग आली.
महत्त्वाची बाब म्हणजे या भागात हर जल योजनेचा समावेश आहे. पण ही योजना पूर्णपणे फसल्याचं चित्र आहे. कोट्यवधी खर्च करुनही वस्तीपर्यंत पाणी नळाद्वारे पोहोचलं नाही. या योजनेतील पैसा जातो कुठे असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.

