• Mon. Mar 9th, 2026

    शिल्पाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, प्रसिद्ध अभिनेत्री Shilpa Shetty साई चरणी नतमस्तक

    शिल्पाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, प्रसिद्ध अभिनेत्री Shilpa Shetty साई चरणी नतमस्तक

    Shilpa Shetty Visit Shirdi Saibaba Temple : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कुटुंबीयांसोबत शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. साई संस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. साई चरणी नतमस्तक होत शिल्पाने प्रार्थना केली. यावेळी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि मुलगी समीक्षा मातोश्री सुनंदा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची बहीण रिना ही देखील उपस्थित होती.

    Lipi

    मोबीन खान, शिर्डी : सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज कुटुंबासह शिर्डीत साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. साई चरणी नतमस्तक होत शिल्पाने प्रार्थना केली. यावेळी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि मुलगी समीक्षा मातोश्री सुनंदा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची बहीण रिना ही देखील उपस्थित होती. दरम्यान साईबाबा संस्थानच्या वतीने शिल्पा शेट्टी आणि संपूर्ण कुटुंबियांचा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सन्मान केला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. यावेळी शिल्पाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मंदिर परिसरात एकच गर्दी केली होती.

    साई दर्शनानंतर मंदिर परिसरात शिल्पाने पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, बाबांचं बोलावणं यंदा उशिरा आलं, मला आनंद आहे मी सर्व परिवारासह येथे आले. मी जेव्हा येथे येते तेव्हा असं वाटतं परत घरी आले. मी जे काही आहे बाबांचं हात डोक्यावर असल्याने आहे. बाबांची शिकवण आचरणात आणून मी इथे आहे. श्रध्दा आणि सबुरी ठेवा. बाबांवर विश्वास ठेवा ते जे करतील ते चांगल्यासाठीच करतील.

    ड्रेस कलर बद्दल पत्रकारांनी विचारले असता शिल्पा म्हणाली राणी पिंक माझा आवडता रंग असल्याने मी जेव्हा येथे येते तयार होऊन येते. आम्ही खूप प्रवास करून थकून आलो. मात्र येथे आल्यावर थकवा दूर झाला. बाबांनी शक्ती दिली. पैशांच्या व्यतिरिक्त बाबांनी भरपूर काही दिलं. जीवनात सुख महत्त्वाचं असतं. जीवनात जितके चढ उतार बघितले माझा अंधविश्वास म्हणा किंवा दृढ विश्वास मला माहित आहे जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, अशी प्रतिक्रिया शिल्पा शेट्टी हिने माध्यमांशी बोलताना दिली आहे.

    नीता अंबानी यांनी देखील नुकतंच घेतलं साईंचं दर्शन

    नुकतंच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनीदेखील शिर्डीला जावून साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. यावेळी देखील चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. नीता अंबानी यांचा शिर्डी दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला होता. नीता अंबानी यांना एका चाहत्याने मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला करा, अशी विनंती केली होती. त्यावर नीता अंबानी यांनी साईबाबांची इच्छा असं प्रत्युत्तर त्या चाहत्याला दिलं होतं

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed