Raigad Accident News: रायगडमध्ये एका इनोव्हा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर या इनोव्हाने दुचाकीला फरफटत नेलं. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रायगडच्या अलिबाग येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
इनोव्हाची दुचाकीला जोरदार धडक
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील खडताळ पूलपासून रेवस बाजूकडे जाणारी इनोव्हा कार क्रमांक एम एच ०२ डी जे ८१२१ ही भरधाव वेगात होती. सदर इनोव्हा वरील चालक हा त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन मानी फाटा नजिक असलेल्या मसाला मिल येथे आली असता पुढे जाणारी मोटर सायकलला जोरदार धडक दिली. धडकेत इनोव्हा कार चालकाने धडक दिलेली दुचाकी २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेली.
Nagpur News: माझा मित्र मला बोलावतोय… दोस्ताने आयुष्य संपवलं, विरह सहन होईना, दोन दिवसांनी सचिननेही तेच केलं
संतप्त नागरिकांकडून इनोव्हाची तोडफोड
या घटनेने परिसरातील नागरिक संतप्त झाले, त्यांनी दुचाकीला धडक दिलेल्या इनोव्हा कारची तोडफोड करत काही काळ वाहतूक रोखून धरली असल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी इनोव्हा कारचालकाला ताब्यात घेतलं असून जमावाला देखील शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातातील जखमी पती पत्नी यांना जिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाटील दाम्पत्य अलिबागहून रेवसकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळी जमाव संतप्त झाला असल्याने अलिबाग पोलिसांनी अधिक फौजफाटा मागवून जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अलिबाग रेवस या रस्त्यावर गेल्या चार महिन्यात पंचवीसहून अधिक अपघात झाले असून चार-पाच जणांनी नाहक जीव गमावला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण होणे हे गरजेचे आहे, असं मत अलिबाग नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल चोपडा यांनी व्यक्त केलं.

