Raigad News : बदलापूर मधील शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन विद्यार्थीनींवर अत्याचार केल्याच्या घटनेने जनतेमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला होता. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना कर्जतमधून समोर आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. करण दीपक पाटील (वय, २४) असे आरोपीचे नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणारा आहे.
Pune Crime : 36 वर्षीय दाजींनी दोन गोळ्या दिल्या, पुण्यातील 18 वर्षीय मेहुणी बेशुद्ध, अत्याचार करुन अश्लील व्हिडिओ काढले
करणच्या या घृणास्पद कृत्याबद्दल पीडित मुलींनी आपल्या पालकांना माहिती दिली. भयभीत झालेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीत नमूद केले की, आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्या मुलींना मांडीवर बसवून नको तिथे स्पर्श करायचा. तसेच त्यांनी सीटवर बसण्यास नकार दिला तर तो त्यांना मारहाण सुद्धा करत होता.
धक्कादायक म्हणजे हा सर्व धक्कादायक प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरु असल्याचे पीडित मुलींनी पालकांना सांगितले. याप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याची माहिती मुलीच्या आईनं दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर ठरत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आता स्कूल बस मालकाची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी करण पाटील यांच्यासह ज्यांचा-ज्यांचा या प्रकरणाशी संबध असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी पीडितांच्या कुटुंबीयांनी केली आहे. यापूर्वी बदलापूरमध्येही असाच प्रकार घडला होता. आता कर्जतमध्येही ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

