Engineering Student Ends Life in Kalamboli : नवी मुंबईतील कळंबोलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आत्महत्येचं कारण काय?
कुणाल पोपट जाधव (वय २०, हंसध्वनी गृहसंकुल सोसायटी, कळंबोली) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मायग्रेन आजाराने त्रस्त झाल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं, आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.
Uddhav Thackeray : ‘कुठे जाताय?…’; चंद्रकांत खैरेंच्या नाराजीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचं विधान
इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुणाल जाधव हा कळंबोलीतील हंसध्वनी गृहसंकुल सोसायटीत कुटुंबासह राहत होता. कुणालचे वडील पोपट जाधव हे मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कुणाल नेरुळमधील तेरणा इंजिनिअरींग कॉलेजमध्ये तिसर्या वर्षाचं शिक्षण घेत होता. मागील काही दिवसांपासून कुणालला मायग्रेनचा त्रास होत होता.
Pune News : पती शेवटच्या घटका मोजत होता, पत्नीने मोबाईलमध्ये स्टेटस ठेवत संपवलं आयुष्य; पुण्यात एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार
डोक्यात टोकाचे विचार येतात, वडिलांनाही सांगितलेलं
सतत मायग्रेनच्या होणाऱ्या त्रासामुळे तो नेहमी असह्य होत असे. त्यामुळे त्याच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत असल्याचं त्याने वडिलांना सांगितलं होतं. मात्र प्रत्येक वेळी त्याच्या वडिलांनी आपल्या लेकाची कुणालची याबाबत समजूत काढली होती. मात्र मायग्रेनचा त्रास असह्य झाल्याने गुरुवारी, १० एप्रिल रोजी, कुणालने टोकांचं पाऊल उचललं. त्याने मानग्रेनच्या त्रासातून आपलं आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Navi Mumbai Nnews : सिक्युरिटीची नजर चुकवून इमारतीच्या गच्चीवर गेला, काही कळायच्या आत… इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
त्यादिवशी सकाळी काय घडलं?
गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुणालने महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाकडे गच्चीवर जाण्यासाठी चावी मागितली. सुरक्षारक्षकाने मात्र नकार दिला. काही वेळाने सुरक्षारक्षक गच्चीवर पाणी सोडण्यासाठी गेला असता, त्याच्यापाठोपाठ कुणालही गच्चीवर गेला. सुरक्षारक्षकाची नजर चुकवून कुणालने गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

