• Sat. Mar 7th, 2026

    Solapur News : नाट्यमय घडामोडी, भाजपच्या माजी मंत्र्यानेच फडणवीसांच्या पॅनल समोर दंड थोपटले

    Solapur News : नाट्यमय घडामोडी, भाजपच्या माजी मंत्र्यानेच फडणवीसांच्या पॅनल समोर दंड थोपटले

    Solapur APMC Election : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन पॅनल उभे करण्याची घोषणा केली आहे. मात्र, माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी या पॅनलला विरोध दर्शवत दंड थोपटले आहेत.

    Lipi

    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अतिशय रंगतदार निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना सोबत घेणार असल्याची माहिती भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जाहीरपणे दिली होती. काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घेत आम्ही पॅनल उभं करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हे पॅनल निवडणूक लढणार असल्याची माहिती भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली होती.

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बुधवारी 16 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. सांयकाळी 4 वाजण्याच्या सुमारास काँग्रेस नेते तथा माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हासापुरे यांनी राजकीय गणित मांडून श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडी नावाचं पॅनल जाहीर केलं. फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या या पॅनलमध्ये एकूण 15 उमेदवार आहेत.

    फडणवीसांच्या पॅनल समोर भाजपच्याच माजी मंत्र्यांचा पॅनल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवणार असे माजी आमदार दिलीप माने यांनी स्पष्टपणे सांगितले. माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे सुरेश हसापुरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते गणेश वानकर यांनी माध्यमांसमोर माहिती देताना सांगितले, आम्ही पक्षाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एकत्रित आलो आहोत. देवेंद्र फडणवीसांच्या आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीची निवडणूक लढवणार आहोत, असे सांगितले.

    माजी सहकार मंत्री तथा विद्यमान भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी फडणवीसांच्या या पॅनलला विरोध केला आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनासोबत घेत दंड थोपटले आहे. भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पॅनलला ओपन चॅलेंज दिलं आहे.

    18 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण अर्जाची संख्या 391 इतकी आहे. पण यापैकी 321 जणांनी माघार घेतली. 18 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दोन पॅनल आणि अपक्ष मिळून 70 उमेदवार रिंगणात आहेत. रिंगणात असलेली 70 उमेदवारांमध्ये सर्वसाधारण 19,महिला 4,ओबीसी 4, व्हीजेएनटी 6, ग्रामपंचायत सर्वसाधारण 10, एसीएसटी 10, आर्थिक दुर्बल 4, व्यापारी 5, हमाल तोलार 8 अशी एकूण उमेदवार संख्या 70 इतकी आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed