• Mon. Apr 21st, 2025 11:28:21 PM
    घरी निघालेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला, भीषण अपघात

    Edited byशितल मुंढे | Contributed by प्रशांत श्रीमंदिलकर | Lipi | Updated: 16 Apr 2025, 11:27 am

    Pune News : देहूरोड येथे केंद्रीय विद्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक राजोरिया आणि योगेश राजोरिया हे दोघे दुचाकीवरून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ पुणे : देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयाजवळ सोमवारी (ता. १४) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्खा भावांचा मृत्यू झालाय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. दीपक राजोरिया (वय ३४) आणि योगेश राजोरिया (वय ३१) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी घसरली आणि अपघात झाल्याचे सांगितले जातंय. घटनेची माहिती मिळताच लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले.

    अपघातात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, देहूरोड येथील असणाऱ्या पारशी चाळ येथील रहिवासी दीपक राजोरिया आणि योगेश राजोरिया हे दोन सख्खे भाऊ दुचाकीवरून प्रवास करत होते. दुचाकीचा वेग असल्याने दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटल्याने ती घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
    Pune Crime : मी १२०० फूट खोल खाणीत जातोय, मुलीला शेवटचा मेसेज; पुण्याचे व्यावसायिक लक्ष्मण शिंदेंच्या हत्येचं गूढ कसं उकललं?अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव

    या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित बचावकार्य हाती घेतले आणि दोघांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलिसांकडून अपघाताचा तपास करण्याचे काम सुरु असून प्राथमिक माहितीत गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अधिकचा तपास हा पोलिसांकडून केला जातोय. अजून काही माहिती पुढे येते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

    दीपक आणि योगेश यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

    हा अपघात परिसरात चर्चेचा विषय बनला असून स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. दीपक आणि योगेश यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. या भागात अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वेगात वाहन चालवल्याने आपल्याला जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे नियंत्रण ठेवून वाहने चालवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed