Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले उत्तर माझ्याकडे असून, ते ऐकले तर सर्वांच्या पायाखालची वाळू घसरेल, असा दावा खासदार राऊत यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले उत्तर माझ्याकडे असून, ते ऐकले तर सर्वांच्या पायाखालची वाळू घसरेल, असा दावा खासदार राऊत यांनी केला. वाल्मीक कराडचा ‘एन्काउंटर’ करण्याबाबतच्या ऑफरबाबतची तक्रार पोलिसांत नोंद असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेऊन चौकशी का केली नाही, असा प्रश्न करत या सर्व प्रकरणामागे असलेल्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली.उकडतंय म्हणून घराबाहेर झोपले, सख्ख्या भावंडांवर मृत्यूचा एकत्रच घाला; नाशिकमध्ये दोघांचा करुण अंत
नाशिकमध्ये ठाकरे गटाचे आज, बुधवारी (दि.१६) विभागीय निर्धार शिबिर होत आहे. या शिबिराच्या तयारीसाठी खासदार राऊत नाशिकमध्ये असून, त्यांनी मंगळवारी (दि.१५) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक यांचे चुलते श्रीधर नाईक यांचे हत्या प्रकरण हे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच भयानक आहे. काही वर्षात सिंधुदुर्गमध्ये २७ खून झाले असून, त्यातील नऊ खून हे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे झाले आहेत. यामुळे या सर्व प्रकरणांमागे असलेल्या ‘आका’चा शोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा, कारण हा ‘आका’ कॅबिनेटमध्येच बसला आहे.
एका ‘आका’ला कॅबिनेटमधून बाहेर पडावे लागले आहे, आता दुसऱ्या ‘आका’लाही सरकारने पाठीशी न घालता बाहेर काढावे.’ निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्या आरोपांमुळे सरकारकडून होत असलेले ‘एन्काउंटर’ समोर आले आहेत. कासले यांच्या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.Nitin Gadkari: दहा लाख कोटींचे रस्ते, महामार्ग; येत्या दोन वर्षांसाठी नितीन गडकरींचा महत्त्वाकांक्षी संकल्प
‘मतांची किंमत पाचशेवर’
राज्य सरकार पूर्णत: डबघाईला आले असून, ही गोष्ट अर्थमंत्री अजित पवार यांनाही मान्य आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यास आणि ‘लाडक्या बहिणीं’ना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. ‘नमो शेतकरी योजने’चा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा या महिन्यापासूनचा हप्ता १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळेल. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘यावर आता लाडक्या बहिणीने प्रश्न विचारले पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली, त्या मतांची किंमत आता पाचशे रुपयांवर आल्याचा टोला खासदार राऊत यांनी लगावला.सरकारी योजनांच्या निधीवर डल्ला! ‘संजय गांधी’, ‘श्रावणबाळ’सारख्या योजनेत अपहाराचा आरोप करत जनहित याचिका
खासदार राऊत म्हणाले…
- राज्यात महायुतीत प्रचंड वाद सुरू आहेत
- अजित पवारांकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केली
- एकनाथ शिंदेंकडील पाच-पंचवीस आमदार केवळ सत्ता अन् पैशांसाठी महायुतीत
- भाजपमधील लोकच आपल्याला माहिती पुरवत आहेत
- महाभारतातील संजयप्रमाणेच आपल्याला सर्व कळते असा दावा