Solapur Election News : इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस-भाजप एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करण्यात आले आहे.
काँग्रेस भाजप एकत्रित मात्र दुसरीकडे भाजप आमदार स्वतंत्र लढतील?
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील निवडणुकीत भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला काँग्रेस नेते दिलीप माने यांनी दिला पाठिंबा होता. दुसरीकडे भाजपचेच आमदार सुभाष देशमुख हे विरोधी पॅनलमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यंदाच्या निवडणुकीत एकीकडे भाजप आमदाराने काँग्रेसला सोबत घेतले आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपचे आमदार स्वतंत्र निवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘भाजप आमदार म्हणतात आम्ही बिनविरोध…’
भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली,आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वखाली ही निवडणूक लढवत आहोत. यामध्ये कोणत्याही पक्षीय राजकारणचा विषय नाही’.भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोन्ही देशमुख हे आमचे नेते आहेत. त्यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आम्ही केले आहे. पण इतक्या लोकांनी अर्ज दाखल केले आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे पण आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय.
माजी आमदार व विद्यमान काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते दिलीप।मानें सोमवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.यावेळी मानेंनी बोलताना माहिती दिली ,मुख्यमंत्र्यांनी सचिनदादांना सूचना केल्या होत्या त्यांनी आम्हाला आवाहन केले आहे. त्या आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय केला आहे. बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य आहे. सहकारच्या बाबतीत मी स्वतंत्र निर्णय घेत असतो, मी स्वयंभू आहे, असं काँग्रेस नेते दिलीप माने यांनी स्पष्ट केले आहे.